Friday, 10 April 2026

मुंबई महानगर प्रदेशसह विविध जिल्ह्यांना वीजपुरवठा अधिक सक्षम

 मुंबई महानगर प्रदेशसह विविध जिल्ह्यांना वीजपुरवठा अधिक सक्षम

महापारेषणची बाभळेश्वरकुडूस ४०० के.व्ही. वीजवाहिनी कार्यान्वित

 

मुंबईदि. ९ : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचा (महापारेषण) महत्त्वाकांक्षी बाभळेश्वरकुडूस ४०० के.व्ही. हा वीजवाहिनी प्रकल्प गुरूवारी (दि.९) पूर्ण होऊन वीजवाहिनी कार्यान्वित करण्यात आली. ऊर्जा विभागाच्या या प्रकल्पामुळे सुमारे ५ मेगावॅट वीज नुकसान कमी होणार असून मुंबई महानगर प्रदेशातील विद्युत दाबामध्ये योग्य ती सुधारणा होणार आहे. तसेच या व्दिपथ वाहिनीवरून सुमारे ३००० अतिरिक्त वीज वहन क्षमता उपलब्ध होणार असून मुंबईठाणेपालघर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे. अशी माहिती महापारेषण कडून देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi