Friday, 10 April 2026

वीजवाहिनीमुळे सद्यस्थितीतील पडघे–बाभळेश्वर १ व २ या वीजवाहिनीवरील ताण कमी होणार असून

 या प्रकल्पांतर्गत एकूण ७१५ मनोरे उभारण्यात आले असून व्दिपथ वाहिनीची लांबी सुमारे २२८ कि.मी. आहे. यापैकी नाशिक विभागात ४८५ मनोरे उभारणी आणि ३०४ सर्किट कि.मी. तारा ओढण्याचे कामतर वाशी विभागात २३० मनोरे उभारणी आणि १५२ सर्किट कि.मी. तारा ओढण्याचे काम पूर्ण झाले आहे.

या वीजवाहिनीमुळे सद्यस्थितीतील पडघेबाभळेश्वर १ व २ या वीजवाहिनीवरील ताण कमी होणार असून प्रणालीची विश्वासार्हता वाढणार आहे. कुडूस उपकेंद्राला अतिरिक्त वीज स्रोत उपलब्ध होऊन मुंबई परिसरातील वाढत्या वीज मागणीची पूर्तता सुलभ होणार आहे. हा भव्य प्रकल्प २०१० मध्ये मंजूर करण्यात आला पण विविध अडचणींमुळे लांबला होता. स्थानिक लोकप्रतिनिधीआमदारमहसूल विभागपोलिस आणि वनविभाग यांच्या सहकार्य व मदतीमुळे या प्रकल्पाची अंमलबजावणी मेसर्स कल्पतरू प्रोजेक्टस इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीमार्फत करण्यात आल्याचे महापारेषणने म्हटले आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये:

सुमारे २२८ कि.मी. लांबीची वीजवाहिनी

• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण

• मुंबईठाणे परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम व स्थिर

• प्रकल्पामुळे सुमारे ५ मेगावॅट वीज नुकसान कमी होणार

• व्दिपथ वाहिनीव्दारे ३००० मेगावॅटपर्यंत अतिरिक्त वीज वहन क्षमता

• मुंबईठाणेपालघर व अहिल्यानगर जिल्ह्यांना मोठा फायदा

• एकूण ७१५ मनोरे उभारणी नाशिक विभागात ४८५ मनोरेवाशी विभागात २३० मनोरे उभारणी

• GMRT परिसरातून मार्गामुळे विशेष परवानग्या, वनपरवानग्यामोबदले यांसारख्या अडचणींवर मात

• जंगल भागात मानवी श्रम व हॉटलाइन स्ट्रिंगिंगचा वापर

• पडघेबाभळेश्वर वीजवाहिनीवरील ताण कमी होणार

• कुडूस उपकेंद्राला अतिरिक्त वीज स्रोत उपलब्ध

• स्थानिक प्रशासनलोकप्रतिनिधी व विविध विभागांचे सहकार्य

• महापारेषणच्या अधिकाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांचे यश

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi