अभियानाच्या प्रगतीचा जिल्हानिहाय आढावा
महसूल मंत्री श्री बावनकुळे यांनी अभियानाच्या प्रगतीचा जिल्हानिहाय आढावा देखील घेतला. शिबिरांमध्ये येणाऱ्या प्रत्येक अर्जावर ठराविक वेळेत निर्णय घ्यावा. तसेच नागरिकांना अनावश्यक त्रास होऊ नये, याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना त्यांनी दिले. लोकांपर्यंत या शिबिरांची माहिती पोहोचावी यासाठी व्यापक जनजागृती करावी. शिबिरांमध्ये जमिनीच्या नोंदी, फेरफार, वारस नोंद आणि इतर प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यावर यंत्रणेने विशेष भर द्यावा, असे निर्देश मंत्री श्री बावनकुळे यांनी यावेळी दिले.
No comments:
Post a Comment