सिडकोच्या साडेबारा टक्के भूखंडासंदर्भात लवकरच बैठक घेणार
- मंत्री भरत गोगावले
मुंबई, दि. २४ : सिडको महामंडळाच्या ‘साडेबारा टक्के’ (१२.५ टक्के) भूखंड परताव्याचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असून शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित आहे. शेतकऱ्यांनी सहकार्य केले नसते तर प्रकल्प उभे राहिले नसते, याची जाणीव ठेवून निर्णय घेतले जातील. या सर्व प्रकरणी व्यवस्थापकीय संचालक (एमडी) तसेच इतर संबंधित घटकांसोबत तातडीची बैठक घेण्यात येणार असल्याचे मंत्री भरत गोगावले यांनी विधानसभेत सांगितले.
सिडको महामंडळासंदर्भात सदस्य महेश बालदी यांनी अर्धातास चर्चा उपस्थित केली होती. त्यावर मंत्री भरत गोगावले यांनी उत्तर दिले. यावेळी विधानसभेत सिडकोचे अधिकारी अनुपस्थित असल्यासंदर्भात मंत्री भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त करत अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
सभागृहात मांडलेल्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून योग्य तो तोडगा काढला जाईल, असे आश्वासन श्री. गोगावले यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment