राज्यात ५० सायबर पोलीस ठाणे कार्यरत असून लवकरच ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यांनाही या यंत्रणेशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे कोणतीही तक्रार त्वरित मुख्यालयापर्यंत पोहोचून कारवाई वेगाने होईल, असे त्यांनी सांगितले.
सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृतीवरही विशेष भर देण्यात येत आहे. यासाठी ४३ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून दरमहा कोट्यवधी संदेश नागरिकांना पाठवले जाणार आहेत. तसेच ‘महासायबर’ अॅपच्या माध्यमातून नागरिकांना सायबर गुन्ह्यांबाबत माहिती आणि मार्गदर्शन दिले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment