Wednesday, 25 March 2026

एकत्रीकरण करून व्यवसायासाठी कर्ज सुविधेची जोडण्याबाबत शासन सकारात्मक

 महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजनांचे एकत्रीकरण करून व्यवसायासाठी

कर्ज सुविधेची जोडण्याबाबत शासन सकारात्मक

-          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. २५ :- राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांना कर्ज सुविधेशी जोडण्याबाबत शासन सकारात्मक आहे. राज्यातील विविध महामंडळांच्या योजनांचे एकत्रीकरण करून त्या लाडकी बहिण’ सारख्या योजनांशी जोडण्यासंदर्भात  मुख्य सचिवांना निर्देश दिले जातील.  महिलांना क्रेडिट आधारित मदत देऊन स्वावलंबी बनविण्यावर शासनाचा भर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

 

सदस्य अभिजित वंजारी यांनी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळावर थेटकर्ज योजना सुरू करण्याबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकरभाई जगतापराजेश राठोड यांनी उपप्रश्न विचारात सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi