Sunday, 8 March 2026

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत

वाहतूक कोंडीवर मोठा दिलासापायाभूत सुविधांच्या बळावर पुण्याच्या विकासाला गती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

पुणेदि. ८ (जिमाका) : पुण्यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरासाठी मजबूत पायाभूत सुविधा अत्यावश्यक असून शहराला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी शासनाकडून बहुआयामी नियोजन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूलाचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवारकेंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळराज्यमंत्री माधुरी मिसाळमहापौर मंजुषा नागपुरेआमदार सिद्धार्थ शिरोळे,  'पीएमआरडीए'चे आयुक्त डॉ. योगेश म्हसेपुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi