मराठी सिनेमागृह, निर्मात्यांसाठी शूटिंगची व्यवस्था, त्यांना मिळणाऱ्या परवानग्या, त्या परवानग्यामधील सुलभता, त्याबरोबर लागणारे कौशल्य गुणवत्तेबद्दलचा प्लॅटफॉर्म, गुणवत्तेबरोबर लागणारे प्रशिक्षण असे विविध कार्यक्रम शासनामार्फत राबवण्यात येत आहेत असेही मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी म्हणाले, प्रशासन किंवा फिल्मसिटी आणि निर्माते यांच्या संवादातूनच आपल्याला मराठी चित्रपटसृष्टीसाठी काही चांगलं घडवता येणार आहे. मराठी भाषा ही अतिशय चांगल्या पद्धतीने साहित्यनिर्मिती करते आहे. जगातल्या इतर कुठल्या भाषेमध्ये आढळणार नाही, असे कथांचे भांडार मराठी भाषेत आहे. आशयाच्या गुणवत्तेच्या बाबतीत आणखी प्रगती आणि पुढे जाणे आवश्यक आहे. त्याकडे निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी थोडे सजगपणे पाहणे आवश्यक आहे.
एनडी स्टुडिओ, कोल्हापूरच्या चित्रनगरीत अतिशय सुंदर अशा पद्धतीची रचना आणि सुविधा उपलब्ध आहे. या ठिकाणी असलेल्या सुविधांचा जास्तीत जास्त उपयोग निर्मात्यांनी घ्यावा ,असे आवाहन सचिव डॉ.कुलकर्णी यांनी निर्मात्यांना केले
No comments:
Post a Comment