एसटी कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येणार असून सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मद्यपानाचे दुष्परिणाम याबाबत प्रबोधन केले जाणार आहे. तसेच आगारांमध्ये विशेष ‘मद्यपान जनजागृती सप्ताह’ आयोजित करून चालक-वाहक व इतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
यासोबतच जिल्ह्यातील मुख्य बसस्थानक, चालक-वाहक विश्रांतीगृहे तसेच ज्या आगारांमध्ये चालक-वाहक जास्त प्रमाणात थांबतात अशा ठिकाणी मद्यपानास प्रतिबंध करण्यासाठी विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अतिथ्यगृह परिसरातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लाईट-पंखे आदी सुविधांची देखभाल करण्याची जबाबदारीही संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत एसटी प्रशासनाने मद्यपानासंदर्भात कठोर भूमिका घेतली असून या उपाययोजनांमुळे बससेवा अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध होईल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
0000
No comments:
Post a Comment