Friday, 6 March 2026

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील अनियमिततेची चौकशी होणार

 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील अनियमिततेची चौकशी होणार

                                                                                                मंत्री डॉ.उदय सामंत

 

मुंबईदि ५ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील रिक्त पदेएनओसी देण्यातील कथित अनियमितता आणि अधिकाऱ्यांवरील आरोप यांची सखोल चौकशी करण्यात येणार असून दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईलअशी माहिती उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.

विधान परिषदेत सदस्य अमित गोरखेश्रीकांत भारतीयउमा खापरे यांच्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मंत्री डॉ.सामंत म्हणाले कीपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील मुख्य अग्निशमन अधिकारी पद 31 ऑक्टोबर 2022 पासून रिक्त आहे. तत्कालीन अधिकारी  यांच्या सेवानिवृत्तीनंतर पात्र अधिकारी उपलब्ध न झाल्यामुळे हे पद रिक्त ठेवण्यात आले असून त्याचा अतिरिक्त कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देण्यात आला होता.

अग्निशमन विभागातील पदे भरण्यासाठी 17 ऑगस्ट 2022 रोजी जाहिरात देण्यात आली होती. उपमुख्य अग्निशमन अधिकारी आणि विभागीय अग्निशमन अधिकारी अशी दोन पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र या पदांसाठी किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्यक असल्याची अट जाहिरातीत असल्यामुळे अनुभव निकष पूर्ण न करणाऱ्या काही उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आलेअसे त्यांनी सांगितले.

दरम्यानउपअग्निशमन अधिकारी ऋषिकेश चिपाडे यांनी दिलेल्या एनओसी आणि परवानग्यांबाबत काही अनियमितता झाल्याची शक्यता विधान परिषद सदस्यांनी व्यक्त केली असल्यानेया पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाची चौकशी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांमार्फत किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जाईलअसे मंत्री डॉ.सामंत यांनी सांगितले.

चौकशीअंती कोणीही दोषी आढळल्यास एक किंवा अनेक व्यक्तींवर कारवाई करण्यास शासन मागे-पुढे पाहणार नाहीअसेही मंत्री सामंत यांनी शेवटी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi