Tuesday, 24 March 2026

संगमनेरमधील नोटिफाईड झोपडपट्टीचा पीएमएवाय अंतर्गत पुनर्विकास

 संगमनेरमधील नोटिफाईड झोपडपट्टीचा पीएमएवाय अंतर्गत पुनर्विकास

-राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

मुंबईदि. २३ - अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर नगरपालिकेच्या हद्दीत अस्तित्वात असलेल्या नोटिफाईड झोपडपट्टीचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या भागातील रहिवाशांचा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश नगरपालिकेला देण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

 

सदस्य अमोल खताळ यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi