Monday, 16 March 2026

देशाची अन्नसुरक्षा, आर्थिक स्थैर्यासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची

 देशाची अन्नसुरक्षाआर्थिक स्थैर्यासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची

- राज्यपाल जिष्णू देव वर्मा

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 39 वा पदवीप्रदान समारंभ संपन्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मानद 'डॉक्टर ऑफ सायन्सपदवीने सन्मानित

 

शाश्वत शेतीसाठी सर्व घटकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            अहिल्यानगरदि. 15 : जगातील एका भागातील युद्ध व संघर्षाचा परिणाम सर्वत्र होत असल्याने देशाची कृषी व्यवस्था अधिक सक्षम करणे व अन्नसुरक्षा सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. देशाच्या अन्नसुरक्षाआर्थिक स्थैर्य व शाश्वत विकासासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून भारतीय कृषीचे भविष्य तंत्रज्ञानाधारित उपायस्टार्टअप्स व शाश्वत पद्धतींवर अवलंबून आहेअसे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती जिष्णू देव वर्मा यांनी केले.

            राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात  आयोजित 39 व्या पदवीप्रदान समारंभात  ते बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यपालांच्या हस्ते 'डॉक्टर ऑफ सायन्सया मानद पदवीने सन्मानित करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi