महाराष्ट्र लोक भवन येथे बिहार राज्य स्थापना दिवस साजरा
बिहार ही संसदीय परंपरांची जन्मभूमी : राज्यपाल जिष्णु देव वर्मा
मुंबई, दि.२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र लोकभवन येथे 'बिहार राज्य स्थापना दिवस' साजरा करण्यात आला. 'एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्र लोकभवनातर्फे बिहार राज्य स्थापना दिनाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला.
बिहार ही संस्कृती, अध्यात्म व तत्वज्ञानाची भूमी आहे. या भूमीने देशाला भगवान महावीर व भगवान बुद्ध दिले. भारत आज जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे. परंतु त्याहीपेक्षा भारत लोकशाहीची जननी आहे व या लोकशाहीची पाळेमुळे बिहारमधील बुद्ध संघाच्या कार्यप्रणालीमध्ये आहे व त्यामुळे बिहार ही संसदीय परंपरांची जन्मभूमी आहे, असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले.
No comments:
Post a Comment