वीज क्षमता वाढीसाठी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, हायब्रीड ऊर्जा प्रकल्प
वीज निर्मितीच्या विविध स्त्रोतांतून ऊर्जा निर्मितीसाठी टॅरिफ-आधारित स्पर्धात्मक बोली (टीबीसीबी) लागू झाली आहे. "टीबीसीबी माध्यमातून निधी गुंतवणूक होत असल्याने "पुढील ३५ वर्षांसाठी वार्षिक टॅरिफ महसूल निर्माण होईल. जुन्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण केले जाईल.
महापारेषण ही देशातील सर्वात मोठी राज्य ट्रान्समिशन युटिलिटी आहे, ज्याची ट्रान्समिशन क्षमता १,४०,००० एमव्हीए पेक्षा जास्त आहे.
क्षमता वाढीसाठी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, हायब्रीड ऊर्जा निर्मिती प्रकल्प, पारंपारिक जलविद्युत निर्मिती प्रकल्प याद्वारे अक्षय्य ऊर्जाचा वाटा २०२३ मध्ये ३०% वरून २०३० पर्यंत ६०% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.यातून खासगी उद्योगकडून टॅरिफ-आधारित स्पर्धात्मक बोलीद्वारे सुमारे ३०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करून महाराष्ट्र २.५ गिगावॅट राउंड-द-क्लॉक अक्षय्य ऊर्जा क्षमता विकसित करण्याची प्रकल्प उभारले जात आहेत.
No comments:
Post a Comment