महावितरण' ने उत्पन्न वाढीसाठी
'आयपीओ' आणून 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करावा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• एमएसईबी सोलर अॅग्रो पॉवर लिमिटेड कंपनीचे कार्यान्वयन सुरू करावे
· महावितरणच्या पुनर्रचित आराखड्याचे सादरीकरण
मुंबई, दि. २६: ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत उत्पन्नाचा कायमस्वरूपी स्रोत निर्माण करून तोट्याकडून नफ्याकडे वळावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत कंपनीने आपल्या कारभारात ' कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ऊर्जा विभागाने एमएसईबी सोलर अॅग्रो पॉवर लिमिटेड कंपनी निर्माण केली आहे. नवीन कंपनीमुळे कृषी क्षेत्राच्या दायित्वापोटी सध्या तोट्यात असलेल्या महावितरण कंपनीचे विभाजन झाल्यामुळे कंपनी नफ्यात आलेली दिसेल. या कंपनीचे कार्यान्वयन सुरू करण्याची सूचनाही त्यांनी दिली.
No comments:
Post a Comment