त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता
• नाशिक सिंहस्थ कुंभमेळा शिखर समिती बैठक
मुंबई, दि १३: त्र्यंबक-नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात देश-विदेशातून करोडो भाविक येणार आहेत. कुंभमेळ्याच्या माध्यमातून येथे येणारा प्रत्येक भाविक भारताची पर्यायाने महाराष्ट्राचे प्रतिबिंब सोबत नेणार आहे. त्यामुळे याच्या यशस्वी आयोजनातून जगाला आकर्षण वाटणारा कुंभमेळा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
No comments:
Post a Comment