Monday, 16 March 2026

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द निश्चित करून अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करा

 संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द निश्चित करून अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करा

-      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•       संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणधारकाबाबत पुनर्वसन बैठक

मुंबईदि. १३: बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमण धारकांच्या पुनर्वसनासंदर्भात संबंधित यंत्रणांनी  कायमस्वरूपी तोडगा काढावा. पुनर्वसनासाठी उपलब्ध असलेल्या जवळील जागांची पडताळणी करून पुनर्वसनासंदर्भात नियोजन करावे. निश्चित कालावधीत उद्यानाची हद्द निश्चित करून हद्दीवरील नागरिकांचे प्राधान्याने पुनर्वसन करावेअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात आयोजित बैठकीत दिले.

उद्यानातील अतिक्रमणधारकांना पुनर्वसन होईपर्यंत मानवीय दृष्टिकोनातून मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मुलुंड आणि ठाणे बाजूकडील अतिक्रमणधारकांनाही पुनर्वसनासाठी त्या बाजूकडील जागांचा शोध घेऊन नियोजन करावेअसे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

बैठकीला वन मंत्री गणेश नाईकपरिवहन मंत्री प्रताप सरनाईकसांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेआमदार सर्वश्री राजहंस सिंहप्रवीण दरेकर,  प्रकाश सुर्वेराजेंद्र गावितमिहिर कोटेचा उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi