वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कारांचे वितरण
यावेळी मंत्री पाटील यांच्या हस्ते 2023-24 ते 2025-26 या कालावधीतील वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कारांचे तसेच विविध कला पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार सन 2023-24 साठी शिल्पकार किशोर ठाकूर यांना, 2024-25 चा ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द.फडणीस यांना तर 2025-26 पुरस्कार चित्रकार पद्मश्री वासुदेव कामत यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ व्यंगचित्रकार फडणीस यांच्या वतीने त्यांच्या कन्या रूपा देवधर यांनी स्वीकारला. ज्येष्ठ कलाकार पुरस्कार चित्रकार विलास शिंदे यांना देण्यात आला.
कला जीवन गौरव पुरस्कारासाठी 5 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह, ज्येष्ठ कलाकार पुरस्कारासाठी दीड लाख रुपये व सन्मानचिन्ह, तर विभागीय पुरस्कारांसाठी 75 हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले. या प्रसंगी विभागीय स्तरावरील 15 पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले.
65 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी राज्यभरातून एकूण 1266 कलाकृती दाखल झाल्या होत्या. त्यापैकी 268 उत्कृष्ट कलाकृतींचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि उपस्थित मान्यवरांनी गॅलरीतील प्रदर्शित कलाकृतींची पाहणी केली.
No comments:
Post a Comment