Saturday, 14 March 2026

राज्यातील नागरिकांना उत्तम व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्याकरिता

 सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, राज्यातील नागरिकांना उत्तम व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्याकरिता राज्य शासन प्रयत्नशील आहे. विधानसभेत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व खाजगी रुग्णालयांनी सकारात्मक विचारांनी योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

डॉ.निपुण विनायक यांनी एकत्रित आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये राज्य शासनाकडून घेण्यात आलेले निर्णय व झालेले बदल यांची माहिती दिली.

राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारीआण्णासाहेब चव्हाण यांनी उपचारांतील व दरातील वाढरुग्णालय अंगीकरणाची ऑनलाईन कार्यपद्धतीयोजना राबविण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या लागू केलेल्या टीएमएस 2.0एचईएम 2.0 प्रणालीदाव्यांची वेळेवर अदागयीप्रोत्साहनपर लाभ याविषयी सादरीकरण करून उपस्थित खाजगी रुग्णालयांना माहिती दिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi