लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुद्धा विरोधकांनी अपप्रचार चालवला होता. मात्र अर्थसंकल्पात आम्ही या योजनेसाठी तरतूद करण्याचे स्पष्ट केल्याने ही योजना आम्ही अधिक चांगली राबवून महिलांचे सक्षमीकरण करणार आहोत असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रात ग्रामीण आणि शहरी भागांना व्यवस्थित जोडण्यासाठी अत्यंत सुयोग्य पद्धतीचे नियोजन या अर्थसंकल्पात करण्यात आले आहे. यामध्ये रस्ते, मेट्रो, जलमार्ग, तसेच राज्यातील विविध विमानतळ यांना जोडणाऱ्या रस्त्यांचे मोठे जाळे निर्माण करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पर्यटनासाठी पोषक असे राज्य बनविण्याचे उद्दिष्ट्य शासनाने समोर ठेवले आहे. मुंबई महानगरातील २० लाख झोपडीधारकांच्या घरांचा पुनर्विकास करण्यासाठी भाडे तत्वावरील घरांसह १० लाख परवडणारी घरे विकसित करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे असेही ते म्हणाले. एकीकडे आर्थिक शिस्त लावतांना दुसरीकडे एआय आधारित शेतीचा मजबूत पाया रचून कृषी क्षेत्राला नवे दिवस दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे, त्याचप्रमाणे एकूणच विविध विभागांच्या योजनांच्या अंमलबजावणीत तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं दैनंदिन जीवन सहज सुलभ आणि सुखी करण्याकडे ठोस पावलं उचलणारा हा अर्थसंकल्प आहे असेही ते म्हणाले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
ऑरेंज गेट बोगदा प्रकल्पाला प्रारंभ ; मुंबईच्या वाहतुकी स मोठा दिलासा मिळणार ...
No comments:
Post a Comment