Tuesday, 24 March 2026

एआय आधारित व्हलनरेबिलिटी मॅपिंगद्वारे निवडण्यात आलेल्या ११,०९१ जोखीमग्रस्त गावे व शहरी वॉर्डमध्ये विशेष तपासणी मोहीम

 या मोहिमेअंतर्गत एआय आधारित व्हलनरेबिलिटी मॅपिंगद्वारे निवडण्यात आलेल्या ११,०९१ जोखीमग्रस्त गावे व शहरी वॉर्डमध्ये विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. पारंपरिक लक्षणांवर आधारित तपासणीऐवजी जोखीमग्रस्त लोकसंख्येची सक्रीय तपासणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. नि-क्षय पोर्टलवरील एआय विश्लेषणाच्या आधारे सूक्ष्म नियोजन व रूट मॅपिंग करण्यात आले असूनवृद्धमधुमेहीकुपोषितपीएलएचआयव्हीक्षयरुग्णांचे संपर्कस्थलांतरित व झोपडपट्टीतील नागरिकांची १००% तपासणी सुनिश्चित केली जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित हाताने वापरता येणारे क्ष-किरण यंत्रणांद्वारे जलद तपासणी करून संशयित रुग्णांना तत्काळ एनएएटी चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहे. दुर्गम व आदिवासी भागांमध्ये नि-क्षय मोबाईल युनिटद्वारे सेवा पोहोचविण्यात येतील.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi