कृषी मंत्री भरणे यांनी समिती सदस्यांना निर्देश देताना सांगितले की, जळगाव, पुणे आणि सोलापूर या प्रमुख केळी उत्पादक जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधावा. तसेच शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी आणि शेतकरी यांच्यासोबत चर्चासत्र आयोजित करून रोग नियंत्रणासाठी सर्वसमावेशक कार्यप्रणाली तयार करावी.
तसेच कृषी विभागामार्फत केळी उत्पादक जिल्ह्यांमध्ये विशेष जनजागृती मोहीम, शेतकरी मार्गदर्शन शिबिरे आणि तांत्रिक माहितीपत्रके उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
No comments:
Post a Comment