Monday, 9 March 2026

सिंदेवाही (जि. चंद्रपूर) तालुका क्रीडा संकुलाच्या सुधारित आराखड्यास मान्यता

 सिंदेवाही (जि. चंद्रपूर) तालुका क्रीडा संकुलाच्या सुधारित आराखड्यास मान्यता

- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

 

मुंबईदि. ९ :  सिंदेवाही (जि. चंद्रपूर) तालुका  क्रीडा संकुलात आवश्यक क्रीडा सुविधा  वाढविण्यावर भर दिला जात आहे. राज्य क्रीडा विकास समितीमार्फत या क्रीडा संकुलाच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली आहेअशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत दिली.

सदस्य अभिजित वंजारी यांनी सिंदेवाही (जि. चंद्रपूर) तालुका क्रीडा संकुलातील सुविधांबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सदाभाऊ खोतभाई जगतापप्रवीण दरेकर आणि अमोल मिटकरी यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.

मंत्री दत्तात्रय भरणे म्हणालेया क्रीडा संकुलासाठी एक कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात  आला आहे.  तर सुधारित आराखडा व अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.  या क्रीडा संकुलात हॉकी ॲस्ट्रोटर्फ व ४०० मीटर धावनमार्गाचे काम प्रगतीपथावर आहे.

हे क्रीडा संकुल शहरातील बसस्थानकापासून अडीच किलोमीटर आणि रेल्वे स्थानकापासून दीड किलोमीटरवर असून संकुलापर्यंत डांबरी रस्ताही उपलब्ध आहे. त्यामुळे खेळाडू आणि क्रीडाप्रेमींना येथे येण्यासाठी कोणतीही गैरसोय नसल्याचे त्यांनी सांगितले.

या क्रीडा संकुलासाठी आवश्यक नवीन सुविधा दिल्या जातील असे सांगत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणालेया क्रीडा संकुल संदर्भात सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सर्व सदस्यांची बैठक घेतली जाईल. पोलादपूर येथील क्रीडा संकुलबाबतही बैठक घेतली जाईल. अकोला जिल्हा क्रीडा संकुलात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असेही मंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी सांगितले.

०००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi