व्यावसायिक प्रवासी विमान उड्डाण नियमित प्रमाणे सुरू
आखाती देशातील प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण सूचना
मुंबई, दि. 7 : आखाती देशातील युद्ध सदृश्य परिस्थितीमुळे मागील काही दिवस प्रलंबित झालेली विमान सेवा व विमान उड्डाण सुरू झाली आहेत.व्यावसायिक प्रवासी विमान उड्डाणे नियमित सुरू झाल्याने भारतीय नागरिक, पर्यटक व प्रवासी भारतात येण्यासाठी आवश्यकतेनुसार थेट तिकीट आरक्षित करू शकतात, असे परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
आखाती विविध देशात अडकलेल्या प्रवाशांना सहाय्य व अधिक माहितीसाठी संबंधित देशातील भारतीय दूतावास अथवा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयास संपर्क साधावा, अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्तकालीन कार्य केंद्राच्या( SEOC )वतीने देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment