Tuesday, 24 March 2026

राजमाता जिजाऊ’ बस सेवाया नावाने सुरू करण्यात आलेली

 राजमाता जिजाऊ’ बस सेवा

 

राजमाता जिजाऊ’ या नावाने सुरू करण्यात आलेली ही बस सेवा महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देणारी असूनराजमाता जिजाबाई यांच्या प्रेरणादायी कार्याला अभिवादन करणारी आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या स्मरणार्थ ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या नव्या उपक्रमांतर्गत सुमारे 3 हजार बसेस राज्यभरात टप्प्याटप्प्याने दाखल होणार असूनप्रवाशांना अधिक सुरक्षितआरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात यापूर्वी शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’, ‘हिरकणी’ आणि यशवंती’ अशा विविध सेवांचा समावेश असून, ‘राजमाता जिजाऊ’ ही बस सेवा त्या मालिकेत आणखी एक महत्त्वाची भर असणार आहे. या उपक्रमामुळे राज्यातील सार्वजनिक परिवहन अधिक सक्षम आणि प्रवासी-केंद्रित होण्यास मदत होणार आहे.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi