Tuesday, 24 March 2026

माजलगाव वाळू तस्करी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन सखोल चौकशी करण्यात येईल

 माजलगाव वाळू तस्करी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन सखोल चौकशी करण्यात येईल

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबईदि.२४ : बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे कथित पोलिसांच्या संगनमतातून सुरू असलेल्या वाळू तस्करी प्रकरणात संशयित तीन व्यक्तींचे मोबाईल जप्त करण्यात आले होते. या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा देखील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पुनर्प्राप्त करण्यात आला आहे. मात्र या सर्व डेटाच्या विश्लेषणानंतरही संबंधितांमधील थेट संगनमत किंवा परस्पर संबंध सिद्ध करणारे ठोस पुरावे मिळाले नाहीत. तरीही या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन सर्व संभाव्य बाबींची सखोल चौकशी करण्यात येईलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

 

            बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे पोलिसांच्या संगनमताने वाळू तस्करी सुरू असल्याबाबत सदस्य प्रकाश (दादा) सोळंके यांनी प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत सदस्य नाना पटोलेअर्जुन खोतकर यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi