दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संसदीय कारकिर्दीची दखल म्हणून 'गतिमान नागरी सेवा पुरस्कार' देण्याची घोषणा आपल्या कर्तव्यदक्ष नेत्याला वाहिलेली अनोखी आदरांजली आहे.
पायाभूत सुविधा, रोजगार, उद्योग, शेतीविकास, ग्रामविकास, उद्योग, ऊर्जा, विमानतळे, रस्ते, मेट्रो, रेल्वे असा वाहतूक विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रशासनात वापर, रोजगाराभिमुख विकसित पर्यटन, परवडणारी घरे, तिसरी मुंबई, रामटेकजवळ तिसरी चित्रपट नगरी, नवीन नागपूर, विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सवलत, विविध महामंडळासाठी योजना, स्टार्टअपला प्रोत्साहन, सर्वसामान्यांना आरोग्य, सांस्कृतिक वारसा, क्रीडा गुणवत्ता विकास केंद्रे, राज्याचा प्रशासकीय दर्जा उन्नत, पारदर्शक, गतिमान व उत्तरदायी करण्यासाठी प्रयत्न करणार, शासनात ७५ हजार नवीन पदभरती, नागरिकांच्या मालमत्तांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी धोरण, स्मार्ट पोलिसिंग, महसूल प्रणालीचे आधुनिकीकरण, महाराष्ट्र सार्वजनिक खासगी भागीदारी धोरण, पर्यावरण संरक्षण, मुद्रांक अधिनियमातील सुधारणा म्हणजे वेगवान सरकारची धडाकेबाज कामगिरी आहे.
महाराष्ट्रातील नागरिकांच्या जीवनात हा अर्थसंकल्प नक्कीच सकारात्मक बदल घडवेल असेही महसूलमंत्री बावनकुळे यांनी म्हटले आहे.
00000
No comments:
Post a Comment