Thursday, 19 March 2026

मयूर नगर एसआरए प्रकल्पाची पुनर्तपासणी करून पंधरा दिवसांत अहवाल सादर करणार

 मयूर नगर एसआरए प्रकल्पाची पुनर्तपासणी करून

पंधरा दिवसांत अहवाल सादर करणार          

- मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबईदि.१८ : जोगेश्वरी (पूर्व) मयूर नगरमौजे मरोशी येथील १९९६ मधील एसआरए प्रकल्पात २००३ पासून रहिवासी वास्तव्यास असूनप्रकल्प जुना झाल्याने इमारतींची जीर्ण अवस्था व गैरसोयींची शक्यता व्यक्त करण्यात आहे. सर्व मुद्द्यांची पुनर्तपासणी करून पात्रताप्रलंबित भोगवटा प्रमाणपत्रे व अनधिकृत बांधकामांबाबत संयुक्त पाहणी करून पंधरा दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असूनअहवालानुसार दोषींवर कठोर कारवाई होईलअसे माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

 जोगेश्वरी (पूर्व) मयूर नगरमौजे मरोशी (ता. बोरिवली) येथील एसआरए प्रकल्प २५ वर्षांपासून अपूर्ण असल्याचे निदर्शनास आणून दिले. या प्रकल्पातील ७५१ पात्र लाभार्थींना मूलभूत सुविधा मिळत नसून विकासकाकडून नियमभंग व निकृष्ट काम झाल्याबाबत सदस्य अनंत (बाळा) नर यांनी लक्षवेधी  सूचना मांडली.यां लक्षवेधी सूचनेला  उत्तर देताना मंत्री देसाई  बोलत होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi