कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण
ई-गव्हर्नन्समध्ये एससीईआरटीची उल्लेखनीय झेप
मुंबई, दि. 29 — कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे रिअल-टाइम विश्लेषण आणि ट्रॅकिंग करणाऱ्या राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटीची) महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच सर्वोत्तम आयुक्त / संचालक गटातील 68 सहभागींपैकी तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करुन एससीईआरटीला गौरविण्यात आले असून परिषदेच्या वतीने सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे आणि उपसंचालक ज्योती शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. परिषदेचे तत्कालीन संचालक राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शिक्षण व्यवस्थेत डेटा-आधारित निर्णयप्रक्रियेला मोठी चालना मिळाली आहे.
No comments:
Post a Comment