Wednesday, 25 March 2026

५१ प्रकल्प प्रगतीपथावर

 ५१ प्रकल्प प्रगतीपथावर - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन


जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, गोवा-महाराष्ट्र संयुक्त तिलारी प्रकल्पातून कोकणातील सिंचनाला मोठा फायदा होत आहे. त्यातून सुमारे २१ हजार हेक्टर क्षेत्राला पाणीपुरवठा होत असून ३३ गावांना लाभ मिळत आहे. प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. कोकणात मोठे, मध्यम व लघु मिळून १८१ प्रकल्प पूर्ण झाले असून ५१ प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. उर्वरित कामे लवकर पूर्ण करून शेती व पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi