विमा न घेतलेल्या शेतकऱ्यांनाही मदत देण्याचा राज्य शासनाचा मानस
- रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले
हवामान बदलामुळे आंबा व काजू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणात आंब्याखाली १.२४ लाख हेक्टर क्षेत्र असून हजारो शेतकऱ्यांनी विमा घेतला आहे. कमी-जास्त तापमानामुळे नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.
काजू पिकासाठीही विमा योजनेतून नुकसान भरपाई दिली जात असून विमा न घेतलेल्या शेतकऱ्यांनाही मदत देण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. पंचनामे करून लवकरच मदतीची घोषणा केली जाईल. कोकणातील नगदी पिकांना चालना देण्यासाठी विशेष बैठक घेऊन पुढील उपाययोजना ठरवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले
No comments:
Post a Comment