पर्यटन विकासासाठी मत्स्य व बंदर विभागासोबत संयुक्त कृती आराखडा
- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
कोकणातील पर्यटन विकासासाठी मत्स्य व बंदर विभागासोबत संयुक्त कृती आराखडा तयार केला जात असून एमटीडीसीच्या रिसॉर्ट्सना ‘स्टार कॅटेगरी’मध्ये अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी २५० कोटींच्या विशेष पॅकेजची मागणी करण्यात आली असल्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. कोकणातील रस्ते व कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर भर दिला जाणार आहे. कोकणातील पर्यटनाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment