Wednesday, 25 March 2026

पर्यावरण संरक्षणासाठी ठोस उपाययोजना

 पर्यावरण संरक्षणासाठी ठोस उपाययोजना - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे


वातावरणीय बदल हा गंभीर विषय असल्याचे सांगत पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी पर्यावरण संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करत असल्याचे सांगितले. वाढते तापमान, पूर व दुष्काळ यांचा सामना करण्यासाठी वृक्षारोपण, प्रदूषण नियंत्रण आणि नदी पुनरुज्जीवनावर भर दिला जात आहे. नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाची स्थापन करण्याचा प्रस्ताव असून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. २०७० पर्यंत देश कार्बनमुक्त करण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने राज्य शासन काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi