२०० परवानाधारक भूमापकांच्या मदतीने राज्यातील ज्या १७ तालुक्यांमध्ये मोजणी प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित आहेत त्या ठिकाणी प्रथम नियुक्ती करून प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
तसेच राज्यातील प्रत्येक महसूल विभागातील तीन तालुके अशा एकूण १८ तालुक्यांमध्ये पोटहिस्सा मोजणीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी पाच खासगी संस्थांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या भूमापकांचे एक आठवड्याचे प्रशिक्षण १० मार्च २०२६ पासून सुरू होत आहे.
प्रशिक्षणानंतर दोन खासगी भूमापक व भूमि अभिलेख विभागाचा एक भूमापक अशी संयुक्त टीम तयार करून निवडलेल्या १८ तालुक्यांमध्ये पोटहिस्सा मोजणी प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे, असेही महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment