नदी प्रदूषण रोखण्यासाठी लवकरच स्वतंत्र प्राधिकरणाची निर्मिती होणार
- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
मुंबई, दि. २४ : राज्यातील नद्यांमधील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी व ठोस उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र नदी पुनरुजीवन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. या प्राधिकरणामार्फत केवळ नदी प्रदूषण आणि पुनरुजीवनावर लक्ष केंद्रित केले जाईल, अशी माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. चंद्रपूरमधील इरई व झरपट या दोन्ही नद्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा लक्षात घेऊन या नद्यांवर प्राधान्याने काम केले जाईल. प्राधिकरण स्थापन झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात या नद्यांचा समावेश केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment