Monday, 30 March 2026

आरोग्य व वेलनेस क्षेत्रात नवकल्पनांना चालना — महाराष्ट्रात एकात्मिक सेटर ऑफ एक्सलन्स उभारण्यावर भर

 आरोग्य व वेलनेस क्षेत्रात नवकल्पनांना चालना  महाराष्ट्रात एकात्मिक

 सेटर ऑफ एक्सलन्स उभारण्यावर भर

       मुंबई, दि.२८ - आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात एकात्मिक व आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने आरोग्य आणि वेलनेस मधील नवकल्पना  पुढील पिढीतील उत्कृष्टता केंद्रे (Centres of Excellence) उभारणे” या विषयावर महत्त्वपूर्ण सत्राचे आयोजन करण्यात आले.

पल्स वैद्यकीय दोन परिषदेचे जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

या सत्रात तज्ज्ञांनी केलेल्या चर्चेत खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी केवळ प्रशिक्षण नव्हे तर डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, न्यूट्रिशनिस्ट, सायकोलॉजिस्ट यांच्यासह दंतचिकित्सेचा (Oral Health) समन्वय अत्यावश्यक असण्याबाबत एकमत झाले. दंत आरोग्याचा खेळाडूंच्या ऊर्जा, पुनर्प्राप्ती, एकाग्रता व शरीराच्या संतुलनावर थेट परिणाम होत असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

तसेच, पुढील पिढीतील सेंटर ऑफ एक्सलन्स हे केवळ उपचार केंद्र नसून, क्रीडा वैद्यक, दंतचिकित्सा, पुनर्वसन व वेलनेस यांचा समावेश असलेली एकात्मिक आरोग्य व्यवस्था म्हणून विकसित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi