Monday, 23 March 2026

एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न

 एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. १७ : राज्यातील सर्वसामान्य प्रवासी नागरिकांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळमार्फत दर्जेदार प्रवासी सेवा देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी विशेष उपक्रमयोजना राबविण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत सांगितले.

विधान परिषदेत सदस्य अभिजित वंजारी यांनी  म. वि. प. नियम ९२ अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना मंत्री सरनाईक बोलत होते. या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदेज्ञानेश्वर म्हात्रे,  जयंत असगावकरनिरंजन डावखरे यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi