Monday, 23 March 2026

परदेशात रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांची खासगी एजन्सीकडून फसवणूक होवू नये यासाठी राज्य शासनमार्फत

 परदेशात रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांची खासगी एजन्सीकडून फसवणूक होवू नये यासाठी राज्य शासनमार्फत परकीय कंपन्यांशी कौशल्य विकास विभागामार्फत थेट समन्वय साधून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तसेच आयटीआय आणि उद्योग क्षेत्रात समन्वय साधून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

कौशल्य विकासासाठी निधीची कमतरता नसल्याचे सांगत मंत्री लोढा यांनी सांगितले कीएडीबी बँकेकडून ४२०० कोटी रुपयेतर जागतिक बँकेकडून १४०० कोटी रुपयांचा निधी कौशल्य विकास विभागाला मिळाला आहे. या निधीतून राज्यातील सर्व आयटीआयचे आधुनिकीकरण करण्यात येत असून पुढील तीन वर्षांत प्रत्येक आयटीआयचे नूतनीकरण करण्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतीगृहासाठी सुविधाही उभारण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi