कौशल्य विकासासाठी निधीची कमतरता नसल्याचे सांगत मंत्री लोढा यांनी सांगितले की, एडीबी बँकेकडून ४२०० कोटी रुपये, तर जागतिक बँकेकडून १४०० कोटी रुपयांचा निधी कौशल्य विकास विभागाला मिळाला आहे. या निधीतून राज्यातील सर्व आयटीआयचे आधुनिकीकरण करण्यात येत असून पुढील तीन वर्षांत प्रत्येक आयटीआयचे नूतनीकरण करण्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतीगृहासाठी सुविधाही उभारण्यात येणार आहेत.
राज्यातील आयटीआयमध्ये इंडस्ट्रियल मॅनेजमेंट कमिटी गठित करून यामध्ये ३ हजार ७०० ट्रस्टींची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, चार्टर्ड अकाउंटंट आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधींचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच आयटीआयमध्ये टेक्निकल डायरेक्टरची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment