कॉर्पोरेट क्षेत्र आणि सामाजिक संस्थांच्याधील समन्वयाने
राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यात येणार
-सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई,दि.२७ : शासन, कॉर्पोरेट क्षेत्र आणि सामाजिक संस्थांच्याधील समन्वयाने राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र प्रभाव आणि शाश्वतता अभिसरण कार्यक्रम’ अंतर्गत ‘प्रभाव अभिसरण’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागचे प्रधान सचिव, डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रविंद्रन, तसेच कुटुंब कल्याण आयुक्त व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अभियान संचालक डॉ. कादंबरी बलकवडे प्रमुख उपस्थित होते.
मंत्री आबिटकर म्हणाले की, दुर्गम व आदिवासी भागांमध्ये आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी (सीएसइार)चा प्रभावी वापर होणे आवश्यक आहे. पायाभूत सुविधा उभारणीसाठी संस्थांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ औपचारिकता न ठेवता प्रत्यक्ष योगदान दिल्यास आरोग्य क्षेत्रात मोठा बदल घडू शकतो.
सार्वजनिक आरोग्य विभागासोबत सातत्याने समन्वय साधत सीएसआर उपक्रम राबविल्यास राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व प्रभावी होईल, असे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.
कॉर्पोरेट कंपन्यांच्या प्रतिनिधींशी सामाजिक दायित्व (सीएसआर) संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, विविध संस्थांनी सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून आरोग्य विभागाशी समन्वय साधून काम केल्यास राज्यातील आरोग्य सुविधा निश्चितच सुधारतील.
No comments:
Post a Comment