हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत उपलब्ध व्हावी यासाठी एईडी (ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर) आणि सीपीआर (बेसिक लाईफ सपोर्ट) प्रशिक्षणाचा व्यापक प्रसार करण्यासाठी शासन, संस्था आणि नागरिकांनी संयुक्तपणे काम करण्याचा निर्धार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी धोरणात्मक सल्लागार डॉ. संतोष भोसले यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली. त्यानंतर प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांनी राज्य शासनाची आरोग्यविषयक दृष्टी आणि विविध घटकांमधील अभिसरणाची आवश्यकता असल्याचे सांगितले.
No comments:
Post a Comment