Saturday, 28 March 2026

सिंधुदुर्गात आंबा-काजू शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रकल्प राबविणार

 सिंधुदुर्गात आंबा-काजू शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रकल्प राबविणार

- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. 27 : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजू पिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआयतंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सुरवातीला काजू व आंब्यासाठी प्रत्येकी 200 शेतकऱ्यांची निवड करून प्रकल्प सुरू केला जाणार आहे. त्यात आंबा आणि काजू उत्पादकांचा समावेश आहेअसे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजू पिकांसंदर्भात एआयचा वापर करण्याबाबत बारामती एडीटी कृषी विज्ञान केंद्र विषयतज्ञ निलेश नलावडे यांनी सादरीकरण केले. यावेळी दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे,  संचालक (कृषी व नवोपक्रम) डॉ. भूषण गोसावी,  एडीटी कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विषय तज्ज्ञ (मृदा विज्ञान) डॉ. विवेक भोईटे,  सहयोगी संशोधन संचालकप्रादेशिक फळ संशोधन केंद्रवेंगुर्लासिंधुदुर्ग डॉ. वैभव शिंदे धोरणात्मक सल्लागार डॉ. संतोष देशमुखशास्त्रज्ञ डॉ. संजनी साळुंखे उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi