राज्यातील छोट्या महापालिकांमधील विकास कामे करण्यासाठी एकत्रितपणे १ हजार कोटी रुपयांचे अशाच प्रकारचे बॉण्ड भांडवली बाजारात काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून महापालिकांनाही केंद्र शासनाच्या या योजनांचा लाभ मिळेल. नाशिक महापालिकेने अशाच पद्धतीने इनोव्हेटिव्ह फंडच्या माध्यमातून गुणात्मकदृष्ट्या शहराचा विकास करावा, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
कार्यक्रमादरम्यान नॅशनल स्टॉक्स एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नाशिक महापालिकेच्या महानगर आयुक्त मनीषा खत्री यांनी बोंड विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी सोनटक्के यांनी केले कार्यक्रमाला नाशिक महापालिकेतील लोकप्रतिनिधी, तथा अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment