Monday, 30 March 2026

'एआय'मुळे मूल्यमापनाच्या गुणवत्तेत वाढ

 'एआय'मुळे मूल्यमापनाच्या गुणवत्तेत वाढ

 

निपुण महाराष्ट्र’ एआय-सक्षम मूल्यमापन ॲपच्या संकल्पना चाचणीने पायाभूत शिक्षणातील मूल्यमापन प्रक्रियेत नवे पर्व सुरू केले आहे. मूल्यमापन पत्रिकांमधील माहितीचे स्वयंचलित संकलनविद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्याचे एआय-आधारित परीक्षणवर्गस्तरीय तात्काळ विश्लेषण आणि वैयक्तिक शैक्षणिक गरजांनुसार बेंचमार्किंग यामुळे मूल्यमापनाची गुणवत्ता वाढली आहे. निवडक जिल्ह्यांतील पायलटमध्ये ९० टक्क्यांहून अधिक अचूकता आणि ३० ते ४० टक्के वेळ बचत नोंदविण्यात आली.

 

याशिवाय शाळांचे जिओ-टॅगिंग करून पायाभूत सुविधांचे अचूक नकाशे तयार करण्यात आले आहेत. यामुळे शाळांच्या भौतिक मालमत्तेची पडताळणीसुविधांचे नियोजन आणि गरजेनुसार विकासकामांचे प्राधान्य ठरविणे अधिक परिणामकारक झाले आहे.

 

एकूणच या सर्व उपक्रमांमुळे शालेय शिक्षण विभागाने ई-गव्हर्नन्ससेवा सुलभतापारदर्शक प्रशासन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या चारही स्तरांवर उल्लेखनीय प्रगती साधली असून १५० दिवसांच्या कार्यक्रमात विभागाच्या कामगिरीला राज्यस्तरीय मान्यता मिळाली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi