Monday, 30 March 2026

उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी

 उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी

 

मुंबईदि. 29 - केंद्र शासन पुरस्कृत, 'उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाची 2022 ते 27 या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार असाक्षरांना साक्षर करण्यासाठी अंमलबजावणी केली जात आहे. या कार्यक्रमांतर्गत सन 2025-26 मध्ये उल्लास ॲपवर नोंदणी झालेल्या असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा रविवार दि. 29 मार्च 2026 रोजी राज्यात घेण्यात आली. 

 

मराठीहिंदीइंग्रजीऊर्दूगुजरातीकन्नडतेलगूतामिळबंगाली या नऊ माध्यमातून घेण्यात आलेल्या या परीक्षेतून निकषानुसार परीक्षार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून नवसाक्षरांना प्रमाणपत्र व गुणपत्रक एकत्रित देण्यात येणार आहेत. या चाचणीच्या माध्यमातून व्यक्तीच्या जीवनामध्ये आर्थिक साक्षरताकायदेविषयक साक्षरताडिजिटल साक्षरताआपत्ती व्यवस्थापन कौशल्यआरोग्याची काळजी व जागरुकताबालसंगोपन आणि शिक्षणकुटुंब कल्याण ही जीवन कौशल्ये विकसित होण्यास मदत होणार आहे. तसेच त्या अनुषंगाने त्यांचे पुढील जीवनमान उंचावण्यास मदत होईल. 

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi