राज्यात सर्व जिल्हे व शहरांसाठी वातावरणीय कृती आराखडे;
प्रदूषण नियंत्रणासाठी टास्क फोर्स
-पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे
मुंबई, दि. २५ - पर्यावरण व वातावरणीय बदल ही आजच्या काळातील गंभीर जागतिक समस्या असून महाराष्ट्रातही त्याचे परिणाम प्रकर्षाने जाणवत आहेत, या परिणामांपासून बचावासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी वातावरणीय कृती आराखडे तयार करण्यात येत असून प्रदूषण नियंत्रणासाठी टास्क फोर्स तयार करण्यात आला असल्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत नियम २९३ अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावाच्या उत्तरात सांगितले.
No comments:
Post a Comment