Thursday, 26 March 2026

2024 हे मानवजातीच्या इतिहासातील सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले असून

 मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 2024 हे मानवजातीच्या इतिहासातील सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले असून सध्याचे दशकही सर्वाधिक उष्ण आहे. औद्योगिक क्रांतीनंतर मानवनिर्मित कारणांमुळे हवामान बदलाचा वेग वाढला असून तापमानात सरासरी 1.2 अंशांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात नागरीकरण व औद्योगिकीकरणामुळे उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, पूर आणि चक्रीवादळांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या नॅशनल ॲक्शन प्लान ऑन क्लायमेट ॲक्शन धोरणानुसार राज्यस्तरीय व स्थानिक पातळीवरील कृती आराखडे तयार करण्यात येत आहेत. हे आराखडे जिल्हा आणि अमृत शहरांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू असून मुंबई, सोलापूर, नाशिक, रत्नागिरी व संभाजीनगर या शहरांचे आराखडे पूर्ण झाले आहेत. रायगड व संभाजीनगर जिल्ह्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi