शाळेसाठी लोकसहभाग वाढवून लोकचळवळ करा
राज्यात विविध शाळा ग्रामस्थांच्या सहभागाने प्रगतीपथावर आहेत. भौतिक सुविधा, प्रशिक्षण, ज्ञानदान समर्पित भावनेने शिक्षकांनी करावे, मात्र शाळांच्या विकासासाठी लोकसहभाग वाढवून लोकचळवळ तयार करावी. माजी विद्यार्थी संघांना समाविष्ट करून घ्यावे. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमात अग्रेसर असलेल्या शाळांना इतर शाळांची प्रगती होण्यासाठी आसपासच्या शाळांची जबाबदारी देवून त्या शाळा आदर्श कराव्यात, असे निर्देशही भुसे यांनी केली दिले.
गरदरेवाडीच्या (ता. दौड) शाळेने लोकसहभागातून आंतरबाह्य बदल केले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी ही शाळा प्रयत्नशील आहे, याठिकाणी २२ मार्चचा कार्यक्रम यू-ट्यूबवरून थेट प्रसारित करण्यात येणार आहे. या शाळेचा आदर्श घेवून १२५ गावांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंत्री भुसे यांनी दिली.
‘डायट’च्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पदभरतीबाबत आकृतीबंध वित्त विभागाकडे अभिप्रायासाठी पाठविला असून पदभरतीचे प्रस्ताव पाठवावेत, असे प्रधान सचिव देओल यांनी यावेळी सांगितले. यावेळी संचालक वसेकर यांनी डायटमार्फत केल्या जात असलेल्या कामांची, उपक्रमाची सादरीकरणाद्वारे माहिती
No comments:
Post a Comment