Wednesday, 25 March 2026

८९ लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर १७९८.७८ कोटी रुपयांचे वितरण शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

 ८९ लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर १७९८.७८ कोटी रुपयांचे वितरण

शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

 

मुंबईदि. २५ : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत आठव्या हप्त्यापोटी एकूण ८९,७५,२९८ शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर एकूण १७९८.७८ कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट लाभ हस्तांतरण द्वारे वितरित करण्यात आले.

विधान भवनमुंबई येथे नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा आठवा हप्ता वितरण समारंभ झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारकृषी मंत्री दत्तात्रय भरणेउद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंतशालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेराज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वालकृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi