Saturday, 14 March 2026

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भविष्यासाठी महाराष्ट्र सज्ज; डेटा सेंटर क्षेत्रात राज्य आघाडीवर

 कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भविष्यासाठी महाराष्ट्र सज्ज;

डेटा सेंटर क्षेत्रात राज्य आघाडीवर

– पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबईदि. १३ : देशाच्या डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात महाराष्ट्र अग्रस्थानी असून डेटा सेंटर क्षेत्रात राज्याने भक्कम स्थान निर्माण केले आहे. पुढील तीन वर्षांत महाराष्ट्र जागतिक डेटा सेंटर उद्योगात आघाडीचे राज्य म्हणून उदयास येईलअसा विश्वास पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला. मोठ्या प्रमाणावर होत असलेली आंतरराष्ट्रीय गुंतवणूकनवीकरणीय ऊर्जेचा वाढता वापर आणि मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा यामुळे राज्य डेटा सेंटर आणि एआय कंपन्यांचे प्रमुख केंद्र बनत असल्याचे त्यांनी सांगितले.

पश्चिम विभागातील कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) तर्फे आयोजित सातव्या डेटा सेंटर ब्लूप्रिंट परिषदेत पणन मंत्री रावल बोलत होते. या परिषदेत धोरण निर्मातेगुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi